The Sai and Meher Centre for Healing and Spiritualism

साई बाबा आणि मेहर बाबांचे भक्त या नात्याने, साई अाणि मेहर सेंटर फॉर हीलिंग अँड स्पिरिच्युअॅलिझम तर्फे मध्ये आम्ही शिर्डी आणि मेहेराबाद येथे अवतार मेहर बाबा यांच्या समाधीला अनेक साधकांसोबत भेट देण्याचा आनंद घेतला.

विविध कारणांमुळे उदा. आर्थिक अथवा अन्य परिस्थितींमुळे या तीर्थयात्रा  सर्वांनाच करणे शक्य होत नाही. बाबांच्या आशीर्वादाने अामचे केंद्र अशा काही साधकांना शिर्डी आणि मेहेरबाबा यांच्या मेहेराबाद येथील समाधीला भेट देण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी मदत करते. हा उपक्रम डिसेंबर २०१७ मध्ये सुरु करण्यांत आला आणि एप्रिल २०१९ पर्यंत सुमारे १००० लोकांना याचा लाभ मिळाला आहे.

ह्याची व्यवस्था सोपी आहे. मेहेराबादला जाण्याची इच्छा असलेल्या लोकांची संख्या विचारात घेऊन आम्ही गाडी, ड्रायव्हर आणि स्वयंसेवक नेमू शकतो, जे त्यांना तेथे घेऊन जाऊ शकतात. मात्र केंद्र फक्त वंचित, नवख्या लोकांच्या प्रवासासाठीचाच खर्च प्रायोजित करते.

वास्तविकतः ज्यांना खर्च परवडतो अशा लोकांनी खर्चासाठी पैसे देणे अपेक्षित आहे. आपण समाधीच्या शक्तींचा आनंद घेऊ शकता, आश्रमामध्ये थोडा वेळ घालवू शकता आणि दुपारी / संध्याकाळी परत येऊ शकता. वंचित लोकांसाठी दुपारचे जेवण आणि प्रवास १००% प्रायोजित आहे. शिर्डी लांब अंतरावर असल्यामुळे तीन जेवणे उदा. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जाते. मेहेराबादसाठी फक्त दुपारचे जेवण देण्यांत येते. शिर्डीच्या प्रत्येक प्रवासाला सुमारे रु. ३२,०००/- आणि पुण्याजवळ असल्याने मेहेराबादच्या प्रवासासाठी सुमारे रु. १६,०००/- खर्च येतो.

आपण अशा ट्रिपसाठी अंशतः किंवा पूर्णपणे प्रयोजन / सहाय्य  करू शकता. तसेच अापण बस ऑपरेटर किंवा केटरर्सना थेट देयक / खर्चाची रक्कम देखील देऊ शकता.

कधीकधी, आमच्यापैकी कोणालाही केंद्रांतून साधकांच्या / अभ्यागतांच्या समूहांसह जाणे शक्य होत नाही. तेव्हा आम्हांला स्वयंसेवकांची जास्त आवश्यकता असते.


प्रत्येक ट्रिपला जातांना एका गटासोबत किमान दोन स्वयंसेवकांची आवश्यकता असते. प्रवासींचा समूह हा वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या तरुण आणि वृद्ध लोकांचा असतो. स्वयंसेवकांनी या सहभागींना समाधीस्थान तसेच शिर्डी आणि मेहेराबादमधील वेगवेगळ्या आध्यात्मिक स्वारस्याच्या  ठिकाणी नेण्यास सक्षम असावे.

बर्याचदां आम्ही विविध संस्थांमधील वंचित व्यक्ती, मानसिकदृष्ट्या अपंग मुले, अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, अनाथ, बहिरे आणि आंधळे लोक या प्रवासासाठी घेऊन जातो. आम्ही १७, ३२, ४५ किंवा ५० सीटर बसमध्ये समाजातील आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक वर्गातील लोक, घरकाम करणारे लोक,  ड्रायव्हर्स आणि पहारेकरी इत्यादींना घेऊन जातो अाणि सहाय्य करतो. (प्रायोजक आहोत.)

संबंधित संस्थांच्या काळजीवाहकांना अशा व्यक्तींसोबत बरोबर नेणे अनिवार्य आहे, परंतु त्या व्यक्तींच्या खास गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हांला आमच्याकडून किमान स्वयंसेवकांना घेणे देखील आवश्यक असते.

स्वयंसेवकांखेरीज, या उपक्रमास समर्थन देण्याकरितां सर्वप्रकारच्या देणग्यांचे स्वागत आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे,  ही सेवा आर्थिक अडचणीमुळे जे शिर्डी / मेहेराबादला भेट देऊ शकत नाहीत अशा लोकांसाठी आहे. त्यासाठी, साई आणि मेहर सेंटर फॉर हीलिंग अँड स्पिरिच्युअॅलिजमद्वारे खर्च केला जातो. आपण या उपक्रमास आर्थिक मदत / सहाय्य करू इच्छित असल्यास आम्हाला याची खूप मदत होईल लोकांपर्यंत पोचण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी उपयोग होईल.

याव्यतिरिक्त, आम्ही परिचय स्वरूपातही मदतीचा स्विकार करतो. साई आणि मेहर सेंटरच्या हीलिंग आणि अध्यात्मशास्त्राच्या ध्येय आणि उद्देशांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध सामाजिक सेवा संघटना आणि एन्, जी. ओं.चा परिचय ह्या संस्थेच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदतीचा एक मार्ग होऊ शकतो.

जर तुम्हांला स्वयंसेवक व्हायचे असेल अथवा तुम्हाला ह्या उपक्रमाबद्दल अधिक माहितीची आवश्यकता असल्यास, कृपया डॉ गुलशन ठकुराल यांच्याशी संपर्क साधा. एसएमएस किंवा व्हाट्सएप @ 9890024732 आणि ईमेल: gulshanthukral@gmail.com वर संपर्क साधा.

तुमच्या सहकार्यामुळे बदल घडू शकतो.

अवतार मेहेर बाबाकी जय !

Testimonials


More From This Series...